पोस्ट्स

तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ.....

इमेज
प्रेमाचा सुटलाय दरवळ...!!! रंगाळ झालंय, पाखराळ झालंय... दमदार प्रेमाचा आलाय यारवाळ, रट्टाळ जिन्याची संपलीया भळभळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ... सांच्याला झालया झुंजूमुंजू, पिरतीचं दिस हे कुजूबुजू, काही कळना, काही वळना, हा यारवाळ भारीच यंगराळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ. तू केवड्याची पाकळी, मल्लाच भाळली, केसांची बट गाली, करतीया कागाळी ये ना जवळी, जरा जाऊ आभ्भाळी, येड्यावाणी झालं पार, होत्तीया वळवळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ... पाऊस आला चल, भिजूभिजू, झोपाळ्यावर बसून, झुलूझुलू, आलीया येळ, घे ना जवळ, येड्यावणी झालं पार, होत्तीया वळवळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ... #सत्यशामबंधु

विकृत मनोवृत्ती आणि हिंदू महासभा

"जे खलांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भुतास्परस्परे पडो । मैत्रजीवांचे ।। " --------------------------------------------- संत ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज वरील ओवीतून जगाच्या निर्मिकाकडे मागणे मागतात की, ' हे देवा, जे खलप्रवृत्तीचे आहेत त्याचं खलत्व जाऊन, त्यांच्यातील सत्कर्म करण्याची वृत्ती वाढीस लागु दे आणि संपूर्ण जीवांमध्ये मैत्रीची भावना जागृत होउदे." वरील ओवीचा आमच्या ज्ञाना प्रमाणे तरी असाच अर्थ होतो. आता प्रश्न असा आहे की, हे आम्ही आत्ताच का सांगत आहोत. तर त्याला कारण आहे.  अखिल भारतीय हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमात एका उच्च विध्याविभूषित महिलेने  महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडून त्यांची त्यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी  प्रतिकात्मक रित्या हत्या केली. ही महिला महासभेची राष्ट्रीय सचिव असल्याचं सांगितलं जातं.  आता या विकृत मानसिकतेच्या लोकांनी केलेल्या या विकृत घटनेचा संत ज्ञानेश्वरांच्या ओवीशी काय संबंध... त्याच कारण अस की, आम्ही त्या लोकांसाठी ही देवाकडे हीच प्रार्थना मागत आहोत की त्यांचं खलत्व जाणून ते सन्मा...

साहेब तु सरकार तु

साहेब तु सरकार तु.... साहेब तु सरकार तु... हिंदू हृदयांचा सम्राट तु... धगधगती आग, अन्याय राग... भाषेचा गर्व, येणार जाग... फाडून खाणार, वाघ र तु... साहेब तु सरकार तु... कणखर बाणा अन ताठ कणा... कित...

आठवणीत राहील अशी संध्याकाळ आणि ती...

आठवणीत राहील अशी संध्याकाळ...आणि ती.!! कोसळणारा पाऊस, पळणारी माणसं, धावणाऱ्या गाड्या, वाफाळलेला चहा आणि सोबत आपलं वाटावं अस सुंदर माणूस.... किती मस्त वाटत ना..? पण बहुतेक वेळा असा ...

जीवंत मने...

जीवंत मने.... #वाचन_प्रेरणा_दिन वाचनाने काय साध्य होतं हे मला माहित नाही. पण एकदा वाचायला बसलं की स्वतःला हरवून जातो आपण. एक वेगळीच अनामिक शक्ती आपल्या समोर असते जी आपल्या मनाचा आणि बुद्धीचा ताबा घेते. एक वेगळीच दुनिया असते ती...!!! त्यात फक्त आपण आणि आपलं पुस्तक एवढेच दोन नागरिक असतात. कोणीतरी म्हंटल आहे, पुस्तक म्हणजे काही फक्त बाईंडिंग केलेला कागदाचा बंच नाही, तर साक्षात माणसांची 'जीवंत मने' त्यातुन आपल्या समोर ठेवलेली असतात. माणूस म्हंटल की मन हे आलंच. परंतु जीवंत मनं कित्येकांना असतात. फार थोड्या लोकांना..! ज्याला समाजातील हाल अपेष्ठा सहन करणाऱ्यांच दुःख कळलं त्याच मन जीवंत असत अस आम्ही मानतो. आता अशी लोक थोडी कमीच.. माझा एक अमोल म्हणून मित्र आहे. आमच्या ग्रुप मध्ये सतत काहीतरी सामाजिक काम आपण केलं पाहिजे अशी चर्चा आम्ही करतो. त्याच प्लॅंनिंग पण आम्ही सुरू केलं आहे. त्यासाठी दर महिन्याला आम्ही पैसे साठवत आहोत. आणि दिवाळी [2018]नंतर ते आम्ही सामाजिक कार्यासाठी खर्च करायचं ठरवलं ही आहे.  तर एकदा अशीच चर्चा करत असताना अमोल आम्हाला म्हणाला, की 'आपल्या ग्रुप च कार्य यश...

तु अल्लड......

इमेज
आन घे मजसाठी...!! तु अल्लड नदी सारखी, तु झुळूक वाऱ्याची... थांबावे पण थांबत नाही, तु लुकलूक ताऱ्यांची... नजरेचा कटाक्ष तुझ्या, काळजात आरपार जाई... हट्टाने मग रागवताना, अबोल होई जाई-जुई... राग तुझा असतो लटका, पण धांदल माझी उडे... गाल फुगवून बसता तु, धडधड माझी वाढे... पण एक सांगू का तुजला, तुझे हसणे जितके गोड... तितकेच तुझे रुसने, नाही त्याला तोड... कळलेच कधी नाही, यास प्रेम म्हणावे का मैत्री..? परी आवडत होत्या मजला, जागरणाच्या गोंधळ राती... नको प्रेमाच्या आणाभाका, नको शब्द कसला देऊ... असेच राहू आपण, अन मंजुळ गाणे गाऊ... नको रुसवे आणि फुगवे, नको अडवू तुझे शब्द... रागावते का कधी अवनी, जेव्हा अबोल होतो अब्द... जेव्हा असेल हात हाती, तेव्हा चिंता नसेल कोणाची... एकच आन घे मजसाठी, कधी न सोडून जाण्याची... ------------------------------------ सत्यशामबंधु

ती मी आणि बस

ती मी आणि बस... सकाळचे आठ वाजले होते, तरीही माझं उरकलं नव्हतं. आज कॉलेज ला जायला उशीरच झाला होता. ( हा उशीर का होतो असतो हेच मला कळत नाही, सगळं कसं आपोआप वेळेवर व्हायला हवं पण असं काही होत नसत, जाऊद्या) कसबस उरकलं...पाठीवत बॅग टाकली... आईला निरोप घेऊन घराबाहेर पडलो.. " काय सोनोपंत, एवढ्या सकाळी सकाळी कुठे ?" कॉलेजला चाललेलो आहे हे माहीत असूनही हे मोरे काका दररोज हा प्रश्न विचारतात आणि काळ्या बोक्या प्रमाणे उगाचच दात काढीत माझा रस्ता अडवतात. आज त्यांची जिरवायची या हेतूने मी उत्तर दिलं, " काही नाही हो मोरे काका, ही कागदपत्राची भरलेली बॅग घेवून भारत-पाकिस्तान प्रश्न सुटतोय का हे पाहायला दिल्लीला चाललोय, येताय का ? " " कॉलेजला जा आधी वेळेवर, निघाले भारत-पाकिस्तान प्रश्न सोडवायला..." इथे माझीच जिरली, हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला आणि पुढे निघालो. थोड्या वेळातच मी बस स्टॉप वर पोहचलो. माझ्या सारखे उशीर झालेले अनेक प्राणी बस स्टॉप वर पाहुन माझ्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दाटून आला. काही काळ तो तसाच राहिला . नंतर परिस्थिती ची जाणीव होताच मी पुन्हा बस ...

सध्या महाराष्ट्राला झालंय तरी काय....?

सध्या महाराष्ट्राला झालंय तरी काय...? सध्या महाराष्ट्राला काय झालाय हेच समजत नाही. कधी नव्हे इतकी जातीयता वाढिस लागलेली आहे. उठता बसता शाहू फुले आंबेडकरांचे आणि छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच विचारांना हरताळ फासायचा. शाहू फुले आंबेडकर या त्रयीनीं नुसती महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी समता, न्याय आणि बंधुत्वाची शिकवण दिली. मुघलांच्या स्त्रीचाही साडी चोळी देऊन सन्मान करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण राहत आहोत. इतका दैदिप्यमान इतिहास आणि तितकीच अभिमान मिरवण्याजोगी संस्कृती आपली आहे. असं असतानाही आपण आज काय करतोय याचा विचार व्हायला हवा. सध्या महाराष्ट्रात डॉ. शुभा साठे प्रकरण गाजतंय. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत समर्थ रामदास स्वामी हे पुस्तक त्यांनी लिहलेलं आहे. या पुस्तकात सन्मानीय लेखका यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी काही आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. मनात राग यावा असच  ते लिखाण आहे.. नंतर त्यांनी माफीही मागितली परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. महाराजांची व्हायची ती बदनामी होऊन गेली होती. संबंध महाराष्ट्राने शुभा साठ...