पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवाची मुंबई....

इमेज
(फोटो जरी जुना असला तरी अनुभव मात्र नवा आहे..) जीवाची मुंबई मुंबई…. सतत काही ना काही कारणांनी खुणावणारं शहर..  पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहर माझ्या कमालीची आवडती आहेत. त्याची अनेक कारणं आहेत. दोन्ही शहरांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. पुणे तस बऱ्या पैकी शांत शहर आहे आणि त्या उलट मुंबई.. इथे कधी रात्रच होत नाही. सतत माणसांची वर्दळ असते, ये जा सुरू असते.. मुंबई झोपत नाही हे खरं आहे पण ती अनेकांची स्वप्न पूर्ण करते हे ही खर आहे. दी.१६/१२/२०२२ रोजी मुंबईला जाणं झालं. पुण्याइतक्या नसल्या तरी मुंबईच्या ही गोड अशा रम्य आठवणी आहेत. मुंबईचे माहीत नसलेले काही रस्ते आज ही आठवणीत आहेत. त्यांची नावे माहीत नाही, पुन्हा होऊन तिथे जायचं कसं हे ही आठवणार नाही आणि समजणार ही नाही. पण त्या रस्त्यांनी दिलेली आठवणींची शिदोरी मात्र कायम लक्षात राहणारी आहे. काहीं चांगले, काही वाईट आणि काही रोमँटिक अनुभव त्या रस्त्यांनी मला दिले. काळ सरतो, वेळ सरते पण गतकाळातील या आठवणी मात्र कायम सोबत राहतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत तीन गरजा सांगितल्या आहेत. मला त्यात आठवणींना ही ऍड करुशी वाटत