पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिफणवाडी...!!

इमेज
तिफण वाडी .......!!! तिफणवाडी.... पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्थित असलेलं आमचं टुमदार गाव. भात शेती आणि दूध व्यवसाय हे आमच्या गावाचे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत. याशिवाय पुण्या मुंबईत अनेक जण स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे गावात तरुण जरा कमीच. भीमाशंकरच निसर्ग सौदर्य आमच्याही गावातून जातं. भीमा नदीवरील चास-कमान धरणाचा फुगवटा आमच्या गावाला येऊन भिडतो. त्यामुळे आमच्या गावातील जवळ जवळ सर्वच कुटुंबे धरणग्रस्त झालेली आहेत. आज इतकी वर्षे लोटली तरी आमचं पुनर्वसन होत आहे, आम्हाला जमिनी मिळता आहेत, आमचे प्रश्न सुटता आहेत.... सगळं थोतांड, दुसरं काय...  असो...किती बोलणार आणि कुणाला सांगणार... ? तस हे माझं गाव नाही. तिफणवाडी हे माझ्या मामाच गाव. लहानपणीच आई वडील गेल्याने मामाने मला मांडीवर घेतलं. मामाला दुसरा बाप का म्हणायचं याच उत्तर माझ्या मामाकडे पाहून मला मिळत. रांगडा गडी तो... हाडाचा शेतकरी....पण तितकाच मनानं भोळा. घरी दोन गाया आणि एक एकर जमीन एवढीच त्याची संपत्ती. पायजमा, कोपरी अन डोक्यावर मळलेली गांधी टोपी असा त्याचा पेहरावं.. मामी मात्र त्याच्या एकदम विरुद्ध स्वभावाची