सध्या महाराष्ट्राला झालंय तरी काय....?

सध्या महाराष्ट्राला झालंय तरी काय...?


सध्या महाराष्ट्राला काय झालाय हेच समजत नाही. कधी नव्हे इतकी जातीयता वाढिस लागलेली आहे. उठता बसता शाहू फुले आंबेडकरांचे आणि छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच विचारांना हरताळ फासायचा.
शाहू फुले आंबेडकर या त्रयीनीं नुसती महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी समता, न्याय आणि बंधुत्वाची शिकवण दिली. मुघलांच्या स्त्रीचाही साडी चोळी देऊन सन्मान करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण राहत आहोत. इतका दैदिप्यमान इतिहास आणि तितकीच अभिमान मिरवण्याजोगी संस्कृती आपली आहे. असं असतानाही आपण आज काय करतोय याचा विचार व्हायला हवा.
सध्या महाराष्ट्रात डॉ. शुभा साठे प्रकरण गाजतंय. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत समर्थ रामदास स्वामी हे पुस्तक त्यांनी लिहलेलं आहे. या पुस्तकात सन्मानीय लेखका यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी काही आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. मनात राग यावा असच  ते लिखाण आहे..
नंतर त्यांनी माफीही मागितली परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. महाराजांची व्हायची ती बदनामी होऊन गेली होती.
संबंध महाराष्ट्राने शुभा साठे यांचा विरोध केला. परंतु नंतर नंतर या प्रकरणात जातीयता घुसू लागली. या प्रकरणाला ब्राम्हण मराठा असा रंग विनाकारण चढवण्यात आला. शुभा साठे यांच्यावर टीका करताना काही सोशल मीडियावरील स्वतःला शहाणे समजणाऱ्या तथाकथित धर्माच्या व जातीच्या ठेकेदारांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली . समोर एक महिला आहे तिच्याविषयी आपण बोलतोय याचंही भान या मंडळींना नव्हतं.
शुभा साठे यांना विरोध करायचा होता तर अनेक विधायक मार्ग होते परंतु त्याचा वापर न करता आम्हीच कसे संभाजी महाराजांचे रक्षक हे दाखवण्याच्या  नादात ह्या मंडळींनी अत्यंत गलिच्छ शब्दप्रयोग केले. आणि तोच महाराजांचा पहिला अपमान ठरला.
मुघलांच्याही महिलेचा साडी चोळी देऊन सन्मान एकीकडे महाराज करतात आणि दुसरीकडे त्यांचेच अनुयायी एका मराठी महिलेचा असा अपमान करतात. याशिवाय दुसरी लाजिरवाणी गोष्ट उभ्या महाराष्ट्रासाठी कुठलीही नाही हे आम्हाला खेदाने म्हणावंसं वाटत आहे.
शुभा साठे यांच्या लिखाणाचं कुठल्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही हे जितकं खर आहे तितकंच त्यांच्या बद्दल गलिच्छ बोलणाऱ्यांचं वागणेही चूकच आहे. हे सांगयला आम्ही कुणाच्या यांना घाबरत नाही.
शुभा साठे यांच्या लिखाणाचं कुठल्याही पद्धतीने आम्ही समर्थन करत नाही परंतु ज्या शब्दात त्यांच्यावर टीका झाली ती पाहता त्या वर बोलायलाच हवं  होत म्हणून हा लेख प्रपंच...!!!
आजच्या तरुणाईने जास्तीत जास्त वाचायला हवं कारण हे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त वाचनात आहे. कोणी एक सांगतो म्हणून आम्ही ते खर मानणार आहोत का..  कधी आम्ही संभाजी महाराज ऐकून नाही तर वाचून समजून घेणार आहोत. आता ती वेळ आलेली आहे असं आम्हास वाटत.
जाता जाता एकच सांगतो, जातीयता म्हणजे असा रोग आहे जो एकदा जडला कि मग मित्र मित्र राहत नाही आणि शत्रू शत्रू राहत नाही.
ज्याला समजलं त्याला समजलं आणि ज्याला नाही समजलं त्याला कोपरा पासून दंडवत....!!!!
धन्यवाद
सत्यशामबंधू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी