पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तु अल्लड......

इमेज
आन घे मजसाठी...!! तु अल्लड नदी सारखी, तु झुळूक वाऱ्याची... थांबावे पण थांबत नाही, तु लुकलूक ताऱ्यांची... नजरेचा कटाक्ष तुझ्या, काळजात आरपार जाई... हट्टाने मग रागवताना, अबोल होई जाई-जुई... राग तुझा असतो लटका, पण धांदल माझी उडे... गाल फुगवून बसता तु, धडधड माझी वाढे... पण एक सांगू का तुजला, तुझे हसणे जितके गोड... तितकेच तुझे रुसने, नाही त्याला तोड... कळलेच कधी नाही, यास प्रेम म्हणावे का मैत्री..? परी आवडत होत्या मजला, जागरणाच्या गोंधळ राती... नको प्रेमाच्या आणाभाका, नको शब्द कसला देऊ... असेच राहू आपण, अन मंजुळ गाणे गाऊ... नको रुसवे आणि फुगवे, नको अडवू तुझे शब्द... रागावते का कधी अवनी, जेव्हा अबोल होतो अब्द... जेव्हा असेल हात हाती, तेव्हा चिंता नसेल कोणाची... एकच आन घे मजसाठी, कधी न सोडून जाण्याची... ------------------------------------ सत्यशामबंधु

ती मी आणि बस

ती मी आणि बस... सकाळचे आठ वाजले होते, तरीही माझं उरकलं नव्हतं. आज कॉलेज ला जायला उशीरच झाला होता. ( हा उशीर का होतो असतो हेच मला कळत नाही, सगळं कसं आपोआप वेळेवर व्हायला हवं पण असं काही होत नसत, जाऊद्या) कसबस उरकलं...पाठीवत बॅग टाकली... आईला निरोप घेऊन घराबाहेर पडलो.. " काय सोनोपंत, एवढ्या सकाळी सकाळी कुठे ?" कॉलेजला चाललेलो आहे हे माहीत असूनही हे मोरे काका दररोज हा प्रश्न विचारतात आणि काळ्या बोक्या प्रमाणे उगाचच दात काढीत माझा रस्ता अडवतात. आज त्यांची जिरवायची या हेतूने मी उत्तर दिलं, " काही नाही हो मोरे काका, ही कागदपत्राची भरलेली बॅग घेवून भारत-पाकिस्तान प्रश्न सुटतोय का हे पाहायला दिल्लीला चाललोय, येताय का ? " " कॉलेजला जा आधी वेळेवर, निघाले भारत-पाकिस्तान प्रश्न सोडवायला..." इथे माझीच जिरली, हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला आणि पुढे निघालो. थोड्या वेळातच मी बस स्टॉप वर पोहचलो. माझ्या सारखे उशीर झालेले अनेक प्राणी बस स्टॉप वर पाहुन माझ्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दाटून आला. काही काळ तो तसाच राहिला . नंतर परिस्थिती ची जाणीव होताच मी पुन्हा बस

सध्या महाराष्ट्राला झालंय तरी काय....?

सध्या महाराष्ट्राला झालंय तरी काय...? सध्या महाराष्ट्राला काय झालाय हेच समजत नाही. कधी नव्हे इतकी जातीयता वाढिस लागलेली आहे. उठता बसता शाहू फुले आंबेडकरांचे आणि छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच विचारांना हरताळ फासायचा. शाहू फुले आंबेडकर या त्रयीनीं नुसती महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी समता, न्याय आणि बंधुत्वाची शिकवण दिली. मुघलांच्या स्त्रीचाही साडी चोळी देऊन सन्मान करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण राहत आहोत. इतका दैदिप्यमान इतिहास आणि तितकीच अभिमान मिरवण्याजोगी संस्कृती आपली आहे. असं असतानाही आपण आज काय करतोय याचा विचार व्हायला हवा. सध्या महाराष्ट्रात डॉ. शुभा साठे प्रकरण गाजतंय. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत समर्थ रामदास स्वामी हे पुस्तक त्यांनी लिहलेलं आहे. या पुस्तकात सन्मानीय लेखका यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी काही आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. मनात राग यावा असच  ते लिखाण आहे.. नंतर त्यांनी माफीही मागितली परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. महाराजांची व्हायची ती बदनामी होऊन गेली होती. संबंध महाराष्ट्राने शुभा साठे या