पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत चमत्कार : माझा दृष्टिकोन

इमेज
रंग चैतन्याचा... रंग वारीचा... विषय :- संत चमत्कार.... आज हा विषय निवडण्यामागे अनेक कारणं आहेत. आषाढ वारीचा सोहळा आता पुण्यनगरी सोडून पंढरीच्या दिशेने पुढे सरकला आहे. वारकऱ्यांचा उत्साह  हा बरसणाऱ्या पावसाप्रमाणे वाढतच चालला आहे. वारीच्या पर्वात आमच्याही अनेकांबरोबर वारीविषयी सतत चर्चा झडत असतात. असाच एकदा विषय निघाला की संतांनी केलेले किंवा त्यांच्या नावावर काळाचा परिणाम म्हणून आरूढ झालेले चमत्कार आजच्या विज्ञान युगात खरे मानायचे की नाही.  मुळात संतांच्या या चमत्काराविषयी कुठेही ठोस पुरावा नाही. संतांचे जे चरित्रकार होते त्यांनी जे लिहून ठेवलं तेच आज खरं मानलं जातं आहे. मी स्वतः चांगलं किंवा वाईट असा भेदाभेद करत नाही. या जगात काहीच चांगलं किंवा वाईट नसत अस माझं ठाम मत आहे. आपला एखादा जवान जेव्हा पाकिस्तान कडून झालेल्या हल्ल्यात शहीद होतो तेव्हा ती आपल्या साठी वाईट तर पाकिस्तान साठी चागली गोष्ट असते. हेच उलटही होऊ शकत. भारतीय संस्कृती आणि स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या संपूर्ण विश्वाला कुटुंब मानतात. मग जर अस असेल तर वर नमूद केलेली घटना आपण कुठल्या आधारावर चागली