साहेब तु सरकार तु
साहेब तु सरकार तु....
साहेब तु सरकार तु...
हिंदू हृदयांचा सम्राट तु...
धगधगती आग, अन्याय राग...
भाषेचा गर्व, येणार जाग...
फाडून खाणार, वाघ र तु...
साहेब तु सरकार तु...
कणखर बाणा अन ताठ कणा...
कित्येक झुकविल्या गर्विष्ठ माना...
शिवसैनिकांचा एकच ताना...
मातोश्री मंदिर रायगड जाणा..
हिंदुत्व रक्षण्या, शिवांश तु...
साहेब तु सरकार तु....
जातीला गाडलं, धर्माला मानलं..
देशामधी जे थैमान माजलं,
एकीच्या बळास तूच र जाणलं...
शिवसेनेला तु जन्मास घातलं...
मराठी जनाचा नेता र तु,
साहेब तु सरकार तु....
मार्मिक कुंचला तुझा फटकारा,
सामना लेखन तुझा षटकारा,
सामर्थ्य दिले तु दख्खन पाठरा,
जल्लोष झाला रायगड-पुरंदरा..
निर्भीड मनाचा राजा र तु,
साहेब तु सरकार तु...
तुला नाडला त्याला केला आडवा,
मग असुदे तो, कोणीही भडवा,
केला अन्याय मग त्याला तुडवा,
हाच एक मंत्र, मनाशी भिडवा...
पिचलेल्या मनाचं सामर्थ्य तु,
साहेब तु सरकार तु
हिंदू हृदयाचा अभिमान तु,
मराठी मनाचा स्वाभिमान तु,
सळसळत्या रक्ताचा अंगार तु,
शिवबाच्या भगव्याचा आधार तु,
तुझ्या चरणा वरी माझा माथा,
गुण आवडी गाईन तुझी गाथा,
तुझ्या सामोरी शपथ घेतो आता,
हातात धनुष्य अन पाठी भाता...
शिवशाहीचा विश्वास तु,
साहेब तु सरकार तु...
हिंदू हृदयांचा सम्राट तु...(२)
#सत्यशामबंधु
टिप्पण्या