पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ-माझ्या नजरेतून

इमेज
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ  माझ्या नजरेतून…. देशीवाद म्हणजे काय…? ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नेमाडेंनी राबवलेली एक प्रचंड, महाकाय, आणि भयंकर शोधमोहीम म्हणजे हिंदू…. हिंदू हा शब्द पाहून मी ही कादंबरी घेतलीच नाही. हिंदूला टॅगलाईन देताना नेमाडे लिहितात "जगण्याची समृद्ध अडगळ.." मनात विचार आला, अरे ही काय भानगड आहे. एकीकडे समृद्ध म्हणायचं आणि परत तिला अडगळ ही म्हणायचं. बस्स, हे एकमेव कारण आहे हिंदू वाचण्यामाग.  अत्यंत भुरसट, तकलादू, बालिश, खुळचट अशा हिंदुत्वाच्या कल्पना आपण सर्वांनी केलेल्या आहेत. हिंदू असणे म्हणजेच भारतीय असणे अशी समजूत आता एवढ्यात तर खूप वाढू लागलेली आहे. देशात तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आल्यापासून तर हे प्रमाण अधिकच वाढू लागलेल आहे. पण अस थेट विधान मी काही करणार नाही. कारण हा जो काही कट्टरतावाद फोफावतो आहे तो ह्या पाच सहा वर्षात झालेला नाहीये. देश स्वतंत्र झाल्यापासून जी कॉग्रेसी सरकारं देशावर राज्य करून गेली त्यांचा ही ह्यात मोठा वाटा आहे.  स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि कालांतराने धर्मनिरपेक्षता अशी तत्व भारताच्या संविधानाने स्वीका

उदाहरणार्थ कोसला वगैरे....

इमेज
उदाहरणार्थ कोसला वगैरे…  चेवानं लिहिण्याच्या झपाट्यात आपल्याला मिळेल ते रिचवत समोर येईल त्याला वेढत बुडवत उचलत लोटत नदीसारखं पुढेच जात राहिलं की आपोआप त्या त्या मजकुराची अंगची  शैली तयार होते… कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत नेमाडे कोसला काय झपाट्यानं लिहला हे सांगताना वरील उद्गार काढतात. १९६३ साली वयाच्या २५व्या वर्षी नेमाडेंनी कोसलाला जन्माला घातलं.  ही मराठीतील नुसती क्रांतीच नव्हती तर मराठीवर नेमाडेंनी केलेले अनंत उपकार होते. होय उपकारच होते… तो काळ लघुकथांचा होता. अनेक सुमार दर्जाच्या लघुकथा ह्याच काळात मराठीत धुमाकूळ घालत होत्या. आता हे नेमाडेंचं निरीक्षण.. आणि ते तितकं खरं ही आहे. भाषेतील तोच तो गुळगुळीतपणा नेमाडेंनी पहिल्या प्रथम खरखरीत करून टाकला. तो कोसलाच्या रूपाने… कोसलाचा शब्दनशब्द नेमाडेंची बंडखोरीचं दाखवून देतो. तसा महाराष्ट्रला बंडखोरीचा मोठा इतिहास लाभलेला आहे. चक्रधर स्वामी आणि माउलींनी सुरू केलेली ही गंगोत्री वाहत वाहत आणि विस्तारत नेमाडेंच्या पर्यंत येऊन ठेवते आणि पुढे  जातही  ही राहते. हे नेमाडेंच थोरपण… ते मी काय वर्णावं… …. मागच्या वर