पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी आणि शेवंता..!!!

इमेज
मी आणि शेवंता..!!!😊😊 मी आणि शेवंता..!!! प्रेमात मी पहिल्यांदाच पडलो होतो. म्हणजे अक्षरशः पडलोच होतो. प्रेम करावे , एखाद्या मुलीला बाईक वरून फिरवून आणावं, तिला सोनूल्या, पिटुल्या, पिल्लू, जानू असल्या गुलाबी नावांनी हाक मारावी अस खुप काही मी ठरवलं होतं. अगदी मुलगी पटावी म्हणून आमच्याच शेजारच्या गण्याकडे मी क्लास लावले होते. हो.....गण्या गावातला भारी माणूस..! जे कुणालाही जमत नाही किंवा ज्याचं कुणाकडे ही सोल्युशन नाही तसली काम गण्याला हमखास जमतात.  'असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही', इतका सकारात्मक विचारांचा आमचा गण्या. विहिरीला पाणी सांगण्यापासून ते देशाचा पंतप्रधान कोण होईल इथपर्यंत गण्या स्वतःची मत लोकांना सांगत असतो. एकदा तर पठ्याने 'शिरडीला बोकड होईल तुझ्या, शिरपा....' असा तर्क आमच्या गावातल्या शिरपाला सांगितला होता. झालंही तसच, शिरपाच्या शिरडीला दोन बोकड झाले. तेव्हापासून गाण्याकडे लोकांची लाईन लागली. आमच्या गाईला काय होईल..? आमच्या म्हशीला काय होईल..? आमच्या बकरील काय होईल..? गण्या त्या लोकांना   काहीतरी सांगत असे. गाण्याचे कयास बरोबर येत