जीवंत मने...

जीवंत मने....

#वाचन_प्रेरणा_दिन

वाचनाने काय साध्य होतं हे मला माहित नाही. पण एकदा वाचायला बसलं की स्वतःला हरवून जातो आपण. एक वेगळीच अनामिक शक्ती आपल्या समोर असते जी आपल्या मनाचा आणि बुद्धीचा ताबा घेते. एक वेगळीच दुनिया असते ती...!!! त्यात फक्त आपण आणि आपलं पुस्तक एवढेच दोन नागरिक असतात.

कोणीतरी म्हंटल आहे, पुस्तक म्हणजे काही फक्त बाईंडिंग केलेला कागदाचा बंच नाही, तर साक्षात माणसांची 'जीवंत मने' त्यातुन आपल्या समोर ठेवलेली असतात. माणूस म्हंटल की मन हे आलंच. परंतु जीवंत मनं कित्येकांना असतात. फार थोड्या लोकांना..! ज्याला समाजातील हाल अपेष्ठा सहन करणाऱ्यांच दुःख कळलं त्याच मन जीवंत असत अस आम्ही मानतो. आता अशी लोक थोडी कमीच..

माझा एक अमोल म्हणून मित्र आहे. आमच्या ग्रुप मध्ये सतत काहीतरी सामाजिक काम आपण केलं पाहिजे अशी चर्चा आम्ही करतो. त्याच प्लॅंनिंग पण आम्ही सुरू केलं आहे. त्यासाठी दर महिन्याला आम्ही पैसे साठवत आहोत. आणि दिवाळी [2018]नंतर ते आम्ही सामाजिक कार्यासाठी खर्च करायचं ठरवलं ही आहे. 
तर एकदा अशीच चर्चा करत असताना अमोल आम्हाला म्हणाला, की 'आपल्या ग्रुप च कार्य यशस्वी होईल अगर नाही होणार पण असे कार्य करायचा विचार आपल्या मनात येत आहे हेच आपलं यश आहे...'
अमोल च म्हणणं मला एकदम पटलं. कारण आजच्या तरुणांतील सर्वांचा म्हणत नाही परंतु बहुतेकांचा असा विचार नसतो. पैसे आले की ते कुठेतरी उधळपट्टी करून खर्च करण्याकडे अनेकांनाचा कल असतो. अर्थात हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यात आम्ही कोणालाही दोष देत नाही. परंतु जीवंत मनाच्या व्यक्तींचा शोध घेत असताना त्या व्यक्ती मला इतरत्र न सापडत आमच्यातच सापडल्या त्या आमच्या ह्या विचारांमुळेच..!!!
अशी संवेदनशील मने आपल्याला आपल्यात रुजवायची असेल तर वाचन महत्वाच आहे असं मी मानतो. मी खुप काही वाचलं आहे असा माझा अजिबात दावा नाही. आजही वाचायला बसलं की हमखास झोप येते.पाहिलं याच प्रमाण जास्त होतं. झोपेच्या गोळ्या खाणाऱ्यांना मी अनेक वेळा पुस्तक वाचण्याचा सल्ला ही दिलेला आहे. बिचाऱ्यांनी तो मनावर घेतला नाही.. असो..
पण नंतर नंतर झोप येणे कमी झालं आणि आता वाचताना झोप येत नाही. आता वाचत राहावंसं वाटत... परंतु दररोज वाचन होत नाही पण जेव्हा ही वाचन होत तेव्हा ते मनापासून होतं.  वाचनामुळे प्रत्येक गोष्टी कडे आणि घटनेकडे एका तार्किक दृष्टीने पाहायला लागलो. स्वतःचा विचार आणि मत त्यावर मांडू लागलो. यामुळे दुसऱ्याच्या म्हणण्याचा आणि मताचा प्रभाव कमी होऊन माझं स्वतःच मत मी बनवू लागलो. आणि ते दुसऱ्यांना पटवून देऊ ही लागलो. हा एक सकारात्मक बदल माझ्यात वाचनामुळे झाला अस मला वाटतं.
वाचनामुळे महाराष्ट्रच पुरोगामीत्व कळलं, शिवाजी  हे फक्त मनगटात न ठेवता काळजातून कार्यात कसे उतरावायचे हे समजलं. संभाजी ही व्यक्ती नसून ती जीवनगाथा आहे हे समजलं.
मैत्री कशी असावी हे समजलं. हसता हसता रडायचं कस आणि रडता रडता हसायचं कस हेही समजलं. एखाद्याला नुसतं शब्दनीच कस ठोकायचा हे समजलं आणि एखाद्याला शब्दांचीच कस गोंजारायच हेही समजलं.
वाचन ही एक चिरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती सतत चालत राहणार आहे. तिच्या बरोबर आपल्याला ही अखंड चालतच राहावं लागणार आहे. कारण विचार हे प्रत्येक पिढी नुसार बदलत असतात ते समजून घ्यायचे असतील तर वाचन महत्वाचेच....!!!!

हीच ओळख सर्वांना व्हावी म्हणून आमचा ग्रुप दिवाळी नंतर विविध कॉलेज च्या NSS Camp ला भेटी देऊन  पुस्तक वाटप व वाचनाचं महत्व तरुणांना पटवून देणार आहे.  त्यासाठी आपणही आपलं योगदान देऊ शकता....

संपर्क:
परिवर्तन प्रतिष्ठान, शिक्रापूर
ता- शिरूर जि. पुणे 412208
मोबा.
प्रमोद भैरवकर- 9960619027
अमोल वारे -  9503850418
विकास साबळे- 8975772734
नीतीन जाधव- 9960882707
शुभम सोनवणे 9975146455

धन्यवाद..!!!

#सत्यशामबंधु


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी