पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भौतिक सुख आणि संतसाहित्य...

इमेज
सर्व सुखाचे आगरू । बापराखुमादेवीवरू ।। असं माऊली म्हणतात. ते खरंच आहे. सुखाची आनंदीची शोधाशोध तुम्ही भौतिक जगात कितीही घ्या. तिथे त्याचा शोध कधीच लागणार नाही. ते सुख विठ्ठलाच्या चरणातच आहे. मुळात हे जगच एक संसार आहे. तुम्ही आम्ही जन्म घेतो तेव्हापासून या संसाराची आपल्या आयुष्यात सुरुवात होते. लग्न आणि त्यानंतर वाढणारा एकूणच पसारा हा या संसाराचा अत्यंत छोटा भाग आहे.  मग संसार म्हणजे काय..? मला अस वाटतं की, जिथे बंधन येतात तो संसार.. मानवाने बंधमुक्त जगावं, स्वतंत्र असावं अस फक्त आपण म्हणतो पण तस आहे का..? तर अजिबात नाही.. जन्म झाल्याबरोबर आपल्यावर काही ना काही बंधन येतात. मग ती काही आपली स्वतःचीच असतात,काही कौटुंबिक असतात तर काही सामाजिक असतात. आणि या सर्व बंधनातून सुटण्यासाठी आपण भौतिक सुखाच्या मागे लागतो. गाडी, बांगला, कपडे- लत्ते, आभूषणे आणि इतर इतर इतर... या सगळ्या गोष्टी जमवायला लागतो.आणि या सर्वांच्या मागे इतके लागतो की खरा आनंद, समाधान कशात आहे हेच विसरून जातो.  आता काही जण म्हणतील. मग माणसाने पैसाच कमावचा नाही तर जगणार कसे..? असा प्रश्न आला की मला खरच हसायला होत . त्

वर्तुळ... वर्तुळाच परिघ आणि तुम्ही आम्ही...

इमेज
प्रत्येकाचं एक वर्तुळ असतं. त्या वर्तुळाच्या आत, परिघावर आणि बाहेर अशी काही प्रेमाची, नात्याची, ओळखीची माणसे असतात. नव्या जुन्यांची ये जा असते.. ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. सात अब्ज पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या जगात अशी ये जा अगदीच साधी आणि सहज गोष्ट आहे. त्यामुळे वर्तुळाच्या बाहेर आणि अगदी परिघावर सुद्धा कोण आहे..? का आहे..? याचा विचार आपल्याकडून फारसा होत नाही. सहसा कामानिमित्ताने होणाऱ्या ओळखी या परिघावर असतात आणि बाकीचे परिघाच्या बाहेर.. खर जीवन असतं ते परिघाच्या आतल्या माणसांबरोबर. त्यात आपल्या घरचे असू शकतात पण असतीलच असे नाही. वर्तुळाच्या आत तेच असतात जे आपल्याला हवे असतात. तिथे बंधन म्हणून काहीच नसतं. आपण स्वतःच्या मनाला भावलेल्या व्यक्तींना परिघाच्या आत घेत असतो. हे सर्वस्वी आपल्या मनाच्या मान्यतेवर अवलंबून असते. परंतु जेव्हा आपल्याला इतरांच्या परिघाच्या आत जायचं असतं तेव्हा नक्की आपण कसे वागतोय यावर बरचसं अवलंबून असतं. इथे दोन मार्ग संभवतात.. एक म्हणजे जबरदस्तीने आणि दुसरा प्रेमाने…. जबरदस्तीने कुठलीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत सध्या होऊ शकते. परंतु इथे म