तु अल्लड......

आन घे मजसाठी...!!

तु अल्लड नदी सारखी,
तु झुळूक वाऱ्याची...
थांबावे पण थांबत नाही,
तु लुकलूक ताऱ्यांची...

नजरेचा कटाक्ष तुझ्या,
काळजात आरपार जाई...
हट्टाने मग रागवताना,
अबोल होई जाई-जुई...

राग तुझा असतो लटका,
पण धांदल माझी उडे...
गाल फुगवून बसता तु,
धडधड माझी वाढे...

पण एक सांगू का तुजला,
तुझे हसणे जितके गोड...
तितकेच तुझे रुसने,
नाही त्याला तोड...

कळलेच कधी नाही,
यास प्रेम म्हणावे का मैत्री..?
परी आवडत होत्या मजला,
जागरणाच्या गोंधळ राती...

नको प्रेमाच्या आणाभाका,
नको शब्द कसला देऊ...
असेच राहू आपण,
अन मंजुळ गाणे गाऊ...

नको रुसवे आणि फुगवे,
नको अडवू तुझे शब्द...
रागावते का कधी अवनी,
जेव्हा अबोल होतो अब्द...

जेव्हा असेल हात हाती,
तेव्हा चिंता नसेल कोणाची...
एकच आन घे मजसाठी,
कधी न सोडून जाण्याची...

------------------------------------ सत्यशामबंधु


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी