पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणीत राहील अशी संध्याकाळ आणि ती...

आठवणीत राहील अशी संध्याकाळ...आणि ती.!! कोसळणारा पाऊस, पळणारी माणसं, धावणाऱ्या गाड्या, वाफाळलेला चहा आणि सोबत आपलं वाटावं अस सुंदर माणूस.... किती मस्त वाटत ना..? पण बहुतेक वेळा असा अनुभव आपल्याला क्वचितच येतो आणि बहुतेक वेळा तो आपल्याला घडवून ही आणावा लागतो. माझ्या बाबतीत असा अनुभव मात्र आपसूकच घडला. कामा निमित्ताने पुण्याला जाणं झालं. पुण्याला जायला तस कारण लागत नाही. उगाच म्हणूनही मी पुण्याला अनेक वेळा गेलेलो आहे. पुण्याचे रस्ते आणि पुण्याची माणसं हे माझे आवडीचे विषय..!  बस मधून उतरताना माझ्या समोरच्या आजोबांना मी विचारलं, ' उतरायचे का बाबा..?' बाबा म्हणाले, ' मग पुढ कशाला आलोय, काय बाजाराला बसायचे का..?' मी आपलं उतरून घेणं पसंत केलं. ही अशी माणसं तुम्हांला पावला गणिक मिळतील... मस्त असतात ती...!!! काम झाल्यानंतर माझी घरी जायची घाई सुरू झाली. कारण  घरी जाताना मध्ये वाघोली नावच एक अक्राळ विक्राळ गाव लागत. ट्राफिक साठी हे गाव खूप प्रसिद्ध... त्यामुळे लवकरच निघालो.  पाऊस सुरूच झाला होता आणि बस मध्ये खूपच गर्दी होती त्यामुळे प्रचंड शीण आला होता. अपेक्षेप्रमाणे वाघोलीत