पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी आणि शेवंता..!!!

इमेज
मी आणि शेवंता..!!!😊😊 मी आणि शेवंता..!!! प्रेमात मी पहिल्यांदाच पडलो होतो. म्हणजे अक्षरशः पडलोच होतो. प्रेम करावे , एखाद्या मुलीला बाईक वरून फिरवून आणावं, तिला सोनूल्या, पिटुल्या, पिल्लू, जानू असल्या गुलाबी नावांनी हाक मारावी अस खुप काही मी ठरवलं होतं. अगदी मुलगी पटावी म्हणून आमच्याच शेजारच्या गण्याकडे मी क्लास लावले होते. हो.....गण्या गावातला भारी माणूस..! जे कुणालाही जमत नाही किंवा ज्याचं कुणाकडे ही सोल्युशन नाही तसली काम गण्याला हमखास जमतात.  'असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही', इतका सकारात्मक विचारांचा आमचा गण्या. विहिरीला पाणी सांगण्यापासून ते देशाचा पंतप्रधान कोण होईल इथपर्यंत गण्या स्वतःची मत लोकांना सांगत असतो. एकदा तर पठ्याने 'शिरडीला बोकड होईल तुझ्या, शिरपा....' असा तर्क आमच्या गावातल्या शिरपाला सांगितला होता. झालंही तसच, शिरपाच्या शिरडीला दोन बोकड झाले. तेव्हापासून गाण्याकडे लोकांची लाईन लागली. आमच्या गाईला काय होईल..? आमच्या म्हशीला काय होईल..? आमच्या बकरील काय होईल..? गण्या त्या लोकांना   काहीतरी सांगत असे. गाण्याचे कयास बरोबर येत

तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ.....

इमेज
प्रेमाचा सुटलाय दरवळ...!!! रंगाळ झालंय, पाखराळ झालंय... दमदार प्रेमाचा आलाय यारवाळ, रट्टाळ जिन्याची संपलीया भळभळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ... सांच्याला झालया झुंजूमुंजू, पिरतीचं दिस हे कुजूबुजू, काही कळना, काही वळना, हा यारवाळ भारीच यंगराळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ. तू केवड्याची पाकळी, मल्लाच भाळली, केसांची बट गाली, करतीया कागाळी ये ना जवळी, जरा जाऊ आभ्भाळी, येड्यावाणी झालं पार, होत्तीया वळवळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ... पाऊस आला चल, भिजूभिजू, झोपाळ्यावर बसून, झुलूझुलू, आलीया येळ, घे ना जवळ, येड्यावणी झालं पार, होत्तीया वळवळ, अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ... #सत्यशामबंधु

विकृत मनोवृत्ती आणि हिंदू महासभा

"जे खलांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भुतास्परस्परे पडो । मैत्रजीवांचे ।। " --------------------------------------------- संत ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज वरील ओवीतून जगाच्या निर्मिकाकडे मागणे मागतात की, ' हे देवा, जे खलप्रवृत्तीचे आहेत त्याचं खलत्व जाऊन, त्यांच्यातील सत्कर्म करण्याची वृत्ती वाढीस लागु दे आणि संपूर्ण जीवांमध्ये मैत्रीची भावना जागृत होउदे." वरील ओवीचा आमच्या ज्ञाना प्रमाणे तरी असाच अर्थ होतो. आता प्रश्न असा आहे की, हे आम्ही आत्ताच का सांगत आहोत. तर त्याला कारण आहे.  अखिल भारतीय हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमात एका उच्च विध्याविभूषित महिलेने  महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडून त्यांची त्यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी  प्रतिकात्मक रित्या हत्या केली. ही महिला महासभेची राष्ट्रीय सचिव असल्याचं सांगितलं जातं.  आता या विकृत मानसिकतेच्या लोकांनी केलेल्या या विकृत घटनेचा संत ज्ञानेश्वरांच्या ओवीशी काय संबंध... त्याच कारण अस की, आम्ही त्या लोकांसाठी ही देवाकडे हीच प्रार्थना मागत आहोत की त्यांचं खलत्व जाणून ते सन्मा

साहेब तु सरकार तु

साहेब तु सरकार तु.... साहेब तु सरकार तु... हिंदू हृदयांचा सम्राट तु... धगधगती आग, अन्याय राग... भाषेचा गर्व, येणार जाग... फाडून खाणार, वाघ र तु... साहेब तु सरकार तु... कणखर बाणा अन ताठ कणा... कित्येक झुकविल्या गर्विष्ठ माना... शिवसैनिकांचा एकच ताना... मातोश्री मंदिर रायगड जाणा.. हिंदुत्व रक्षण्या, शिवांश तु... साहेब तु सरकार तु.... जातीला गाडलं, धर्माला मानलं.. देशामधी जे थैमान माजलं, एकीच्या बळास तूच र जाणलं... शिवसेनेला तु जन्मास घातलं... मराठी जनाचा नेता र तु, साहेब तु सरकार तु.... मार्मिक कुंचला तुझा फटकारा, सामना लेखन तुझा षटकारा, सामर्थ्य दिले तु दख्खन पाठरा, जल्लोष झाला रायगड-पुरंदरा.. निर्भीड मनाचा राजा र तु, साहेब तु सरकार तु... तुला नाडला त्याला केला आडवा, मग असुदे तो, कोणीही भडवा, केला अन्याय मग त्याला तुडवा, हाच एक मंत्र, मनाशी भिडवा... पिचलेल्या मनाचं सामर्थ्य तु, साहेब तु सरकार तु हिंदू हृदयाचा अभिमान तु, मराठी मनाचा स्वाभिमान तु, सळसळत्या रक्ताचा अंगार तु, शिवबाच्या भगव्याचा आधार तु, तुझ्या चरणा वरी माझा माथा, गुण आवडी गाईन तुझी गाथा,

आठवणीत राहील अशी संध्याकाळ आणि ती...

आठवणीत राहील अशी संध्याकाळ...आणि ती.!! कोसळणारा पाऊस, पळणारी माणसं, धावणाऱ्या गाड्या, वाफाळलेला चहा आणि सोबत आपलं वाटावं अस सुंदर माणूस.... किती मस्त वाटत ना..? पण बहुतेक वेळा असा अनुभव आपल्याला क्वचितच येतो आणि बहुतेक वेळा तो आपल्याला घडवून ही आणावा लागतो. माझ्या बाबतीत असा अनुभव मात्र आपसूकच घडला. कामा निमित्ताने पुण्याला जाणं झालं. पुण्याला जायला तस कारण लागत नाही. उगाच म्हणूनही मी पुण्याला अनेक वेळा गेलेलो आहे. पुण्याचे रस्ते आणि पुण्याची माणसं हे माझे आवडीचे विषय..!  बस मधून उतरताना माझ्या समोरच्या आजोबांना मी विचारलं, ' उतरायचे का बाबा..?' बाबा म्हणाले, ' मग पुढ कशाला आलोय, काय बाजाराला बसायचे का..?' मी आपलं उतरून घेणं पसंत केलं. ही अशी माणसं तुम्हांला पावला गणिक मिळतील... मस्त असतात ती...!!! काम झाल्यानंतर माझी घरी जायची घाई सुरू झाली. कारण  घरी जाताना मध्ये वाघोली नावच एक अक्राळ विक्राळ गाव लागत. ट्राफिक साठी हे गाव खूप प्रसिद्ध... त्यामुळे लवकरच निघालो.  पाऊस सुरूच झाला होता आणि बस मध्ये खूपच गर्दी होती त्यामुळे प्रचंड शीण आला होता. अपेक्षेप्रमाणे वाघोलीत