पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज रक्षाबंधन...

आज  रक्षाबंधन. दि. ११/०८/२०२२ भारतीय संस्कृतीत बंधनाला खूप महत्त्व आहे. कुठलाही समाज हा एकट्याने अस्तित्वात येत नसतो. समाज नावाची व्यवस्था उभी राहायला एकापेक्षा अधिक लोकांची गरज असते. आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी काही समाज धुरिणांकडून काही बंधन-नियम आखण्यात आले आणि त्यांचेच पुढे सण समारंभ झाले असं माझं मत आहे. त्यातीलच एक बंधन म्हणजे रक्षा बंधन...  बहिणीचे भावाने रक्षण करावे यासाठी हि संकल्पना अस्थित्वात आली असावी असे वरपांगी दिसून येते. पृथ्वीवरील काही मोजक्या संस्कृत्या सोडल्या तर जवळपास सर्वच संस्कृत्या या पुरुषप्रधान आहेत. त्यामुळे अनेक सण हे त्या नुसारच डिझाईन झालेले दिसतात. पण आजच्या काळाचा विचार केला तर यात अनेक क्रातींकारी बदल होताना दिसतात. आता रक्षाबंधनाचाच विचार केला तर असे दिसून येते कि, आज रक्षाबंधन हे साथ, सोबत करणाऱ्या प्रत्येक नात्याकडून बांधून घेतेले जाते. तू माझे रक्षण कर एवढाच आता हेतू रक्षाबंधनामागे राहिलेला नाहीये. हे प्रमाण अत्यल्प जरी असलं तरी ते आशादायी निश्चितच आहे.  भाऊ बहिणीचे रक्षण करू शकतो, तिला साथ देऊ शकतो, तिच्या मागे ठामपणाने उभा राहू शकतो. पण एक बहीण स