पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवंत मने...

जीवंत मने.... #वाचन_प्रेरणा_दिन वाचनाने काय साध्य होतं हे मला माहित नाही. पण एकदा वाचायला बसलं की स्वतःला हरवून जातो आपण. एक वेगळीच अनामिक शक्ती आपल्या समोर असते जी आपल्या मनाचा आणि बुद्धीचा ताबा घेते. एक वेगळीच दुनिया असते ती...!!! त्यात फक्त आपण आणि आपलं पुस्तक एवढेच दोन नागरिक असतात. कोणीतरी म्हंटल आहे, पुस्तक म्हणजे काही फक्त बाईंडिंग केलेला कागदाचा बंच नाही, तर साक्षात माणसांची 'जीवंत मने' त्यातुन आपल्या समोर ठेवलेली असतात. माणूस म्हंटल की मन हे आलंच. परंतु जीवंत मनं कित्येकांना असतात. फार थोड्या लोकांना..! ज्याला समाजातील हाल अपेष्ठा सहन करणाऱ्यांच दुःख कळलं त्याच मन जीवंत असत अस आम्ही मानतो. आता अशी लोक थोडी कमीच.. माझा एक अमोल म्हणून मित्र आहे. आमच्या ग्रुप मध्ये सतत काहीतरी सामाजिक काम आपण केलं पाहिजे अशी चर्चा आम्ही करतो. त्याच प्लॅंनिंग पण आम्ही सुरू केलं आहे. त्यासाठी दर महिन्याला आम्ही पैसे साठवत आहोत. आणि दिवाळी [2018]नंतर ते आम्ही सामाजिक कार्यासाठी खर्च करायचं ठरवलं ही आहे.  तर एकदा अशीच चर्चा करत असताना अमोल आम्हाला म्हणाला, की 'आपल्या ग्रुप च कार्य यश