पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ-माझ्या नजरेतून

इमेज
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ  माझ्या नजरेतून…. देशीवाद म्हणजे काय…? ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नेमाडेंनी राबवलेली एक प्रचंड, महाकाय, आणि भयंकर शोधमोहीम म्हणजे हिंदू…. हिंदू हा शब्द पाहून मी ही कादंबरी घेतलीच नाही. हिंदूला टॅगलाईन देताना नेमाडे लिहितात "जगण्याची समृद्ध अडगळ.." मनात विचार आला, अरे ही काय भानगड आहे. एकीकडे समृद्ध म्हणायचं आणि परत तिला अडगळ ही म्हणायचं. बस्स, हे एकमेव कारण आहे हिंदू वाचण्यामाग.  अत्यंत भुरसट, तकलादू, बालिश, खुळचट अशा हिंदुत्वाच्या कल्पना आपण सर्वांनी केलेल्या आहेत. हिंदू असणे म्हणजेच भारतीय असणे अशी समजूत आता एवढ्यात तर खूप वाढू लागलेली आहे. देशात तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आल्यापासून तर हे प्रमाण अधिकच वाढू लागलेल आहे. पण अस थेट विधान मी काही करणार नाही. कारण हा जो काही कट्टरतावाद फोफावतो आहे तो ह्या पाच सहा वर्षात झालेला नाहीये. देश स्वतंत्र झाल्यापासून जी कॉग्रेसी सरकारं देशावर राज्य करून गेली त्यांचा ही ह्यात मोठा वाटा आहे.  स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि कालांतराने धर्मनिरपेक्षता अशी तत्व भारताच्या संविधानाने स्वीका