वर्तुळ... वर्तुळाच परिघ आणि तुम्ही आम्ही...

प्रत्येकाचं एक वर्तुळ असतं. त्या वर्तुळाच्या आत, परिघावर आणि बाहेर अशी काही प्रेमाची, नात्याची, ओळखीची माणसे असतात. नव्या जुन्यांची ये जा असते.. ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. सात अब्ज पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या जगात अशी ये जा अगदीच साधी आणि सहज गोष्ट आहे. त्यामुळे वर्तुळाच्या बाहेर आणि अगदी परिघावर सुद्धा कोण आहे..? का आहे..? याचा विचार आपल्याकडून फारसा होत नाही. सहसा कामानिमित्ताने होणाऱ्या ओळखी या परिघावर असतात आणि बाकीचे परिघाच्या बाहेर..

खर जीवन असतं ते परिघाच्या आतल्या माणसांबरोबर. त्यात आपल्या घरचे असू शकतात पण असतीलच असे नाही. वर्तुळाच्या आत तेच असतात जे आपल्याला हवे असतात. तिथे बंधन म्हणून काहीच नसतं. आपण स्वतःच्या मनाला भावलेल्या व्यक्तींना परिघाच्या आत घेत असतो. हे सर्वस्वी आपल्या मनाच्या मान्यतेवर अवलंबून असते.

परंतु जेव्हा आपल्याला इतरांच्या परिघाच्या आत जायचं असतं तेव्हा नक्की आपण कसे वागतोय यावर बरचसं अवलंबून असतं. इथे दोन मार्ग संभवतात.. एक म्हणजे जबरदस्तीने आणि दुसरा प्रेमाने….

जबरदस्तीने कुठलीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत सध्या होऊ शकते. परंतु इथे मला मानसिक जबरदस्ती अभिप्रेत आहे हे लक्षात घ्या. कारण शारीरिक जबरदस्तीच्या जोरावर एखाद्याच्या मनाच्या आत , वर्तुळाच्या आत जाता येणं शक्यच नाही. मग मानसिक जबरदस्ती म्हणजे काय…? सोप्प आहे.. आपण जसे नाहीत तसे भासवून आपल्या विषयी इतरांच्या मनातील विचार मँन्युक्यूलेट करणे होय. थोडक्यात आपण खूप चांगले आहोत असे भासवून इतरांचा विश्वास संपादन करणे. 

या प्रकारामुळे आपण इतरांच्या वर्तुळात प्रवेश मिळवू शकतो.. पण अशा पद्धतीने स्वतःला इतरांवर लादने  हाच एक प्रकारचा गुन्हा आहे हे समजून घ्यायला हवं. परंतु असे प्रकार सध्या वाढत चाललेले आहेत हे मात्र नक्की…

म्हणून मला विचारालं तर मी सांगेल, प्रेमाने जा… प्रेम करा.. कारण सरतेशेवटी प्रेम हेच अंतिम सत्य आहे. 
प्रेमाने जिंकलेलं मन कधीच धोका देत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. 

कुणीतरी आपल्याला त्याच्या मनातलं सांगावं.. कुणाच्या तरी दुःखाचा शेअरिंग पार्टनर आपण असावं असं आपल्या सर्वांना वाटतं.. स्वाभाविक आहे. 
कुणाच्या तरी सुखाच्या आनंदाच्या प्रत्येक गोष्टीत आपला सहभाग असावा, त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपला काही ना काही ठसा असावा.. असही वाटत.. हे ही स्वाभाविक आहे. 

जस मानसिक जबरदस्तीने एखाद्याच्या वर्तुळात जाऊन ही जास्त काळ स्वतःला तिथे टिकवता येत नाही अगदी तसच प्रेमातील अति अपेक्षा सुद्धा तुम्हाला परिघाबाहेर जाण्यास कारणीभूत ठरवू शकतात.  
मला हे माहीत असलायच हवं, मला हे सांगायलाच हवं असा वेडा अट्टहास धरला की समजून जा तुमची बाहेर जायची वेळ जवळ आली आहे. गमतीचा भाग सोडला तर हे खरं आहे..

मला विचारालं तर मी सांगेल अशा वेळी थांबावे.. वाट पहावी.. आणि परिघावरच राहावं. काही व्यक्तींना नुसत आनंदी पाहणं सुद्धा परम आनंद देऊन जाणारी गोष्ट असते आणि याची अनुभूती फक्त परिघावरील व्यक्तीच घेऊ शकतात. 

बऱ्याच वेळा काय होत.. मित्रांचा ग्रुप असतो आणि आपली त्यातील एकाशी नव्याने ओळख झालेली असते. त्यामुळे आपण ही आता त्या ग्रुपच्या सर्व आनंदाच्या क्षणांचे साथी झालो आहोत असं आपल्याला वाटू लागतं. आणि हे नक्कीच स्वाभाविक आहे. असं कुणालाही सहज वाटू शकतं. पण अस गृहीतक मांडून आपण बसलेलो असतो आणि नेमकं कधी तरी आपण काही गोष्टींसाठी विसरलो जातो तेव्हा मात्र आतून दुःखाची जाणीव ओझरती का होईना पण होतेच. 
 आता अशा वेळी काय करावं…? आता हा  प्रश्न ज्याचा त्याचा आहे. 

माझं अस मत आहे की, माणसाने नक्कीच इतरांच्या परिघात असावं. ती माणसंही आपल्या मनाच्या जवळ असावीत. पण या सगळ्यांच बंधन होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी विना अपेक्षा निरपेक्ष प्रेम करणं हाच एकमेव उपाय आहे. तसं न करता सतत स्वतःला इतरांवर लादू लागलो तर आपण कधीच इतरांच्या मनाच्या जवळ जाऊ शकत नाही. 

कसं आहे… नात्यांचा बॅलन्स साधुन प्रत्येकाने एकमेकांच्या परिघावरच असायला हवं.. तिथून प्रेम करावं… वाट पहावी… अशाने काय होईल.. कधीतरी ते आपल्याला सामावून घेतील.. कधीतरी आपण त्यांना सामावून घेऊ…. इकतच...😊


#सत्यशामबंधू #_shubhra_ #love #prem #प्रेम 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा