भौतिक सुख आणि संतसाहित्य...



सर्व सुखाचे आगरू । बापराखुमादेवीवरू ।। असं माऊली म्हणतात. ते खरंच आहे. सुखाची आनंदीची शोधाशोध तुम्ही भौतिक जगात कितीही घ्या. तिथे त्याचा शोध कधीच लागणार नाही. ते सुख विठ्ठलाच्या चरणातच आहे.

मुळात हे जगच एक संसार आहे. तुम्ही आम्ही जन्म घेतो तेव्हापासून या संसाराची आपल्या आयुष्यात सुरुवात होते. लग्न आणि त्यानंतर वाढणारा एकूणच पसारा हा या संसाराचा अत्यंत छोटा भाग आहे. 

मग संसार म्हणजे काय..? मला अस वाटतं की, जिथे बंधन येतात तो संसार..

मानवाने बंधमुक्त जगावं, स्वतंत्र असावं अस फक्त आपण म्हणतो पण तस आहे का..? तर अजिबात नाही.. जन्म झाल्याबरोबर आपल्यावर काही ना काही बंधन येतात. मग ती काही आपली स्वतःचीच असतात,काही कौटुंबिक असतात तर काही सामाजिक असतात. आणि या सर्व बंधनातून सुटण्यासाठी आपण भौतिक सुखाच्या मागे लागतो. गाडी, बांगला, कपडे- लत्ते, आभूषणे आणि इतर इतर इतर... या सगळ्या गोष्टी जमवायला लागतो.आणि या सर्वांच्या मागे इतके लागतो की खरा आनंद, समाधान कशात आहे हेच विसरून जातो. 

आता काही जण म्हणतील. मग माणसाने पैसाच कमावचा नाही तर जगणार कसे..? असा प्रश्न आला की मला खरच हसायला होत . त्याच कारण म्हणजे या प्रश्नांतच याच उत्तर आहे. इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवीय की, आपण पैशाचा स्वीकार हा अपरिहार्यता म्हणून केलेला आहे. ती काही मानवाची निवड नाहीये. सुख आणि सोयी यासाठी मानवाने ठरवून निर्माण केलेली ती एक विनमय पद्धती आहे. ही अपरिहार्यता इतकी स्ट्रॉंगली आपल्यात झिरपली आहे की आपल्याला पैसा थोडा का होईना पण गरजेचा वाटतोच. मग हे वाईट आहे का.... तर नाही पण हे चांगलं सुद्धा नाहींये अस माझं मत आहे. 

साधी गोष्ट आहे.. जेव्हा आजूबाजूला कुणीच नसेल आपण एकटेच असू.. तेव्हा या भौतिक जगातल्या गोष्टी शून्य होऊन जातील. एवढंच काय त्या वेळी आपण अंगावरच्या सर्व कपड्यांचा त्याग केलेला असेल. आणि आपण तेव्हा खऱ्या अर्थाने मोकळे असू. मला अस वाटतं की, जेव्हा अशी अतिप्राचीन अवस्था मानवाला प्राप्त होईल तेव्हा मानवजात खऱ्या अर्थाने सुखी होईल. 

तो पर्यंत या संसारात आपल्याला राहावच लागणार आहे. तिथे पर्याय नाहीये. मी पुन्हा पुन्हा सांगतोय  आपली सध्याची जीवनपद्धती ही आपली अपरिहार्यता आहे, ती आपली निवड नाहीये. 

मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे की नाही..? तर आहे.. संतांनी या सगळ्या मोहजाळातून बाहेर येण्या साठी साधा सरळ भक्तिमार्ग सांगितला आहे. अनेकांना हे पटणार नाही, अनेकांना हे कळणार नाही.. पण वारकरी संतांनी दाखवलेला मार्ग निश्चितच समजून घ्यायला हवा. (संतांच्या या मार्गावर सविस्तर नक्कीच लिहिल) 

 देव देव करा आणि पारमार्थिक व्हा अस माझं अजिबात म्हणणं नाहीये. कर्मकांड आणि जुनाट रूढी परंपरा यांचा मला कायमच तिटकारा आहे. त्यामुळे कर्मा पासून दूर जाऊन कुठंतरी राम राम करत बसा अस मी कधीच सांगणार नाही. पण तरी सुद्धा मला अस वाटत की, या भौतुक जगातून जर सुटायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाच्या पटलावर काही ना काही बदल हे घडवून अनावेच लागतील. आणि हेच बदल घडवून शाश्वत सुखाची अनुभूती आपल्याला करून देण्याचं प्रखर सामर्थ्य हे संतसाहित्याचे नक्कीच आहे.  

संतसाहित्य हेच मुळात प्रेम, शांती आणि करुणेनं भरलेलं आहे. तुम्ही आम्ही कितीही प्रेम करणारी आणि प्रेमळ माणसं जरी असलो तरी सुद्धा आपली ती प्रेम भावना कधी ना कधी दुःख देऊनच जाते. मग अशा आस्थेचा आणि अनुभवाचा उपयोग तो काय..? 

लेखाच्या सुरवातीला म्हणूनच मुद्दामहून मी माऊलींच्या रूपाच्या अभंगातील ( रूप पाहता लोचनी..)  शेवटचं चरण लिहिलं आहे. माऊली सांगतात की , जगात जी म्हणून सुखं असतील त्याच आगर हे माझ्या विठुरायाचं अंतःकरण आहे. सगळी सुखं त्याच्या ठायी आहे. 

माऊलींचा आणि सर्वच वारकरी संतांचा हाच विचार आपल्याला या संसारातून मुक्त करू शकतो. 

भौतिक जगाच्या दुःख सागरातून बाहेर यायचं असेल आणि खर प्रेम करायचं असेल तर संत साहित्याकडे वळा असच मी म्हणेल... 

#सत्यशामबंधू #_shubhra_ #love #संतसाहित्य #संतज्ञानेश्वरमहाराज #माऊली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा