पोस्ट्स

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ-माझ्या नजरेतून

इमेज
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ  माझ्या नजरेतून…. देशीवाद म्हणजे काय…? ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नेमाडेंनी राबवलेली एक प्रचंड, महाकाय, आणि भयंकर शोधमोहीम म्हणजे हिंदू…. हिंदू हा शब्द पाहून मी ही कादंबरी घेतलीच नाही. हिंदूला टॅगलाईन देताना नेमाडे लिहितात "जगण्याची समृद्ध अडगळ.." मनात विचार आला, अरे ही काय भानगड आहे. एकीकडे समृद्ध म्हणायचं आणि परत तिला अडगळ ही म्हणायचं. बस्स, हे एकमेव कारण आहे हिंदू वाचण्यामाग.  अत्यंत भुरसट, तकलादू, बालिश, खुळचट अशा हिंदुत्वाच्या कल्पना आपण सर्वांनी केलेल्या आहेत. हिंदू असणे म्हणजेच भारतीय असणे अशी समजूत आता एवढ्यात तर खूप वाढू लागलेली आहे. देशात तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आल्यापासून तर हे प्रमाण अधिकच वाढू लागलेल आहे. पण अस थेट विधान मी काही करणार नाही. कारण हा जो काही कट्टरतावाद फोफावतो आहे तो ह्या पाच सहा वर्षात झालेला नाहीये. देश स्वतंत्र झाल्यापासून जी कॉग्रेसी सरकारं देशावर राज्य करून गेली त्यांचा ही ह्यात मोठा वाटा आहे.  स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि कालांतराने धर्मनिरपेक्षता अशी तत्व भारताच्या संविधानाने स्...

उदाहरणार्थ कोसला वगैरे....

इमेज
उदाहरणार्थ कोसला वगैरे…  चेवानं लिहिण्याच्या झपाट्यात आपल्याला मिळेल ते रिचवत समोर येईल त्याला वेढत बुडवत उचलत लोटत नदीसारखं पुढेच जात राहिलं की आपोआप त्या त्या मजकुराची अंगची  शैली तयार होते… कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत नेमाडे कोसला काय झपाट्यानं लिहला हे सांगताना वरील उद्गार काढतात. १९६३ साली वयाच्या २५व्या वर्षी नेमाडेंनी कोसलाला जन्माला घातलं.  ही मराठीतील नुसती क्रांतीच नव्हती तर मराठीवर नेमाडेंनी केलेले अनंत उपकार होते. होय उपकारच होते… तो काळ लघुकथांचा होता. अनेक सुमार दर्जाच्या लघुकथा ह्याच काळात मराठीत धुमाकूळ घालत होत्या. आता हे नेमाडेंचं निरीक्षण.. आणि ते तितकं खरं ही आहे. भाषेतील तोच तो गुळगुळीतपणा नेमाडेंनी पहिल्या प्रथम खरखरीत करून टाकला. तो कोसलाच्या रूपाने… कोसलाचा शब्दनशब्द नेमाडेंची बंडखोरीचं दाखवून देतो. तसा महाराष्ट्रला बंडखोरीचा मोठा इतिहास लाभलेला आहे. चक्रधर स्वामी आणि माउलींनी सुरू केलेली ही गंगोत्री वाहत वाहत आणि विस्तारत नेमाडेंच्या पर्यंत येऊन ठेवते आणि पुढे  जातही  ही राहते. हे नेमाडेंच थोरपण… ते मी का...

डायरी ऑफ अॅन फ्रँक : माझ्या नजरेतून

इमेज
अॅन फ्रँकच्या डायरी विषयी.... शाळेत- कॉलेज मध्ये असताना उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तशा सध्या कोरोनाच्या सुट्ट्या आपण सगळेच जण उपभोगत आहोत. मी जरी विनोदाने हे म्हणत असलो तरी प्रकरण काही विनोदाने घेण्या जोगे नाहीये. जागतिक माहामारी म्हणून सध्या ह्या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. तेव्हा आपणही काळजी घेऊन घरातच बसायला हवं आणि प्रशासनाला सहकार्य करायला हवं. परंतु हे घरात बसने काही सोप्प काम नाही. माणसाला सतत काही ना काही करमणूक हवीच असते. तसा माणूसही थोडा विचित्रच प्राणी आहे. अर्थातच त्याला मीही काही अपवाद नाहीये बर.... जेव्हा खूप काम असत तेव्हा तो म्हणतो वेळ मिळत नाही आणि आता वेळच वेळ आहे तर म्हणतो वेळ जात नाही. घरात इनमीन पाच माणसं आहेत आमच्या. आता प्रत्येक जण करून करून किती करमणूक करणार. बर सासू सुनांची भांडण ठरलेलीच आहे. ती कुठल्याही युगात आणि कुठल्याही परिस्थितीत होऊ शकतात. त्याने माझी करमणूक होते पण त्यालाही काही सीमा आहेच ना.. आता वडिलांकडून करमणुकीची अपेक्षा करणे म्हणजे महाकठीण काम. टीव्ही पाहता पाहता ते विचारतात, 'हे कोरोनाचं प्रकरण वाढत चाललंय.....

तिफणवाडी...!!

इमेज
तिफण वाडी .......!!! तिफणवाडी.... पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्थित असलेलं आमचं टुमदार गाव. भात शेती आणि दूध व्यवसाय हे आमच्या गावाचे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत. याशिवाय पुण्या मुंबईत अनेक जण स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे गावात तरुण जरा कमीच. भीमाशंकरच निसर्ग सौदर्य आमच्याही गावातून जातं. भीमा नदीवरील चास-कमान धरणाचा फुगवटा आमच्या गावाला येऊन भिडतो. त्यामुळे आमच्या गावातील जवळ जवळ सर्वच कुटुंबे धरणग्रस्त झालेली आहेत. आज इतकी वर्षे लोटली तरी आमचं पुनर्वसन होत आहे, आम्हाला जमिनी मिळता आहेत, आमचे प्रश्न सुटता आहेत.... सगळं थोतांड, दुसरं काय...  असो...किती बोलणार आणि कुणाला सांगणार... ? तस हे माझं गाव नाही. तिफणवाडी हे माझ्या मामाच गाव. लहानपणीच आई वडील गेल्याने मामाने मला मांडीवर घेतलं. मामाला दुसरा बाप का म्हणायचं याच उत्तर माझ्या मामाकडे पाहून मला मिळत. रांगडा गडी तो... हाडाचा शेतकरी....पण तितकाच मनानं भोळा. घरी दोन गाया आणि एक एकर जमीन एवढीच त्याची संपत्ती. पायजमा, कोपरी अन डोक्यावर मळलेली गांधी टोपी असा त्याचा पेहरावं.. मामी मात्र त्याच्या एकदम विरुद्ध स्वभा...

मी आणि शेवंता..!!!

इमेज
मी आणि शेवंता..!!!😊😊 मी आणि शेवंता..!!! प्रेमात मी पहिल्यांदाच पडलो होतो. म्हणजे अक्षरशः पडलोच होतो. प्रेम करावे , एखाद्या मुलीला बाईक वरून फिरवून आणावं, तिला सोनूल्या, पिटुल्या, पिल्लू, जानू असल्या गुलाबी नावांनी हाक मारावी अस खुप काही मी ठरवलं होतं. अगदी मुलगी पटावी म्हणून आमच्याच शेजारच्या गण्याकडे मी क्लास लावले होते. हो.....गण्या गावातला भारी माणूस..! जे कुणालाही जमत नाही किंवा ज्याचं कुणाकडे ही सोल्युशन नाही तसली काम गण्याला हमखास जमतात.  'असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही', इतका सकारात्मक विचारांचा आमचा गण्या. विहिरीला पाणी सांगण्यापासून ते देशाचा पंतप्रधान कोण होईल इथपर्यंत गण्या स्वतःची मत लोकांना सांगत असतो. एकदा तर पठ्याने 'शिरडीला बोकड होईल तुझ्या, शिरपा....' असा तर्क आमच्या गावातल्या शिरपाला सांगितला होता. झालंही तसच, शिरपाच्या शिरडीला दोन बोकड झाले. तेव्हापासून गाण्याकडे लोकांची लाईन लागली. आमच्या गाईला काय होईल..? आमच्या म्हशीला काय होईल..? आमच्या बकरील काय होईल..? गण्या त्या लोकांना   काहीतरी सांगत असे. गाण्याचे कयास बरोबर येत...