कळले सारे होते..

न कळता ही तुला कळले सारे होते,

रात न ही अपुली कळले सारे होते,


एक वादळ आले अन घेऊन सारे गेले,

आठवणींचे गाव माझे जळले सारे होते.


पहिल्या भेटीचे किस्से अजून ताजे आहे,

उष्ट्या चहाव आपले जुळले सारे होते.


कैक रस्ते मग असेच पालथे घातले,

एका वळणावर मग वळले सारे होते.


तुझ्या न माझ्या नव्हते हातात काही,

जातीचे विष असे भिनले सारे होते.


तु न एकटा एवढे लक्षात ठेव आता,

त्या दगडावर चाफे फुलले सारे होते. 


#सत्यशामबंधू  #_shubhra_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा