तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ.....

प्रेमाचा सुटलाय दरवळ...!!!


रंगाळ झालंय, पाखराळ झालंय...
दमदार प्रेमाचा आलाय यारवाळ,
रट्टाळ जिन्याची संपलीया भळभळ,
अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ...

सांच्याला झालया झुंजूमुंजू,
पिरतीचं दिस हे कुजूबुजू,
काही कळना, काही वळना,
हा यारवाळ भारीच यंगराळ,
अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ.

तू केवड्याची पाकळी, मल्लाच भाळली,
केसांची बट गाली, करतीया कागाळी
ये ना जवळी, जरा जाऊ आभ्भाळी,
येड्यावाणी झालं पार, होत्तीया वळवळ,
अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ...

पाऊस आला चल, भिजूभिजू,
झोपाळ्यावर बसून, झुलूझुलू,
आलीया येळ, घे ना जवळ,
येड्यावणी झालं पार, होत्तीया वळवळ,
अन तुह्या माह्या प्रेमाचा सुटलाय दरवळ...

#सत्यशामबंधु

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जीवाची मुंबई....

पुस्तक परिचय: डियर तुकोबा

फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी