पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा

इमेज
"थिजलेल्या काळाचे अवशेष" नीरजा यांची ही पहिली कादंबरी.  भारत आणि त्याची ओळख विविधतेत एकता अशी आहे. किती भारी ओळख आहे ही... शाळेत असताना आपल्या सगळ्यांना ही ओळख पहिल्यांदा झाली ती प्रतिज्ञेमधून ..  भारत माझा देश आहे... आमकं, तमकं, फलानं, बिस्तानं  अशी एक प्रतिज्ञा होती आपल्याला, तुम्हाला नीट लक्षात असेल तर आठवेल..  त्याच प्रतिज्ञेत एक वाक्य आहे.. "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विवीधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे..."  किती मस्त वाक्य आहे हे.. पण या वाक्याला आता काहीही अर्थ उरलेला नाहीये. किती लोकांना या देशाची विविधता मान्य आहे..? हा मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. "एकता" तर कुठच्या कुठं तोंड काळं करून लपून बसलीये तीच तिला माहीत. प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म पाहून मी नक्की कोणत्या बाजूला असावं हे आपण आता ठरवायला लागलोय. या अशा मत निर्मितीत कसलाही विचार उरला नाही, कसलाही आचार उरला नाही. कुणीतरी येतो आणि काहीतरी सांगतो आणि आपण ते खर मानतो येवढी बौद्धिक क्षमता आपली खालावली आहे.  वर्षानवर्षं ज्या वर्ण व्यवस्थेने आपल्यातल्याच एका वर्गाला प्रचं...

फकिरा : उशिरा हातात पडलेली असामान्य कादंबरी

इमेज
फकिरा…  उशिरा हातात पडलेली एक असामान्य कादंबरी. ‘स्मशानातलं सोनं’ हा कुठल्याशा इयत्तेत आम्हाला एक धडा होता.  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाची आणि त्यांच्या वास्तववादी लेखनाची इथेच ओळख झाली.  खाण अचानक बंद झाल्याने भीमा आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. ती वेळ आणि ती गरिबी भीमाला स्मशानापर्यंत घेऊन जाते आणि जळकी मढी उकरायला लावते, त्या राखेतून सोनं गोळा करायला लावते. गरिबांचा हा संघर्ष अण्णा भाऊ पोटतिडकीने उभा करतात. तेव्हा त्यांची लेखणी खोल खोल रुतत जाते.   तो धडा वाचल्यापासून अण्णा भाऊंच्या लेखणीवर आणि पर्यायाने त्यांच्यावर विशेष प्रेम जडलं आणि ते वाढत गेलं. अण्णा भाऊंच्या साहित्याविषयी विलक्षण ओढ निर्माण झाली. परंतु एक सल मात्र मनात कायम राहील, ती म्हणजे ‘फकीरा’ फार उशिरान हातात पडली.  पण असो… ती मी वाचली हे महत्वाचं.. अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा ही कादंबरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. ही अर्पण पत्रिकाच फाकिराच्या संघर्षमय वाटचालीची प्रचीती देऊन जाते आणि ती फकिरा वाचताना खरी ही ठरते. आता क...