डायरी ऑफ अॅन फ्रँक : माझ्या नजरेतून
अॅन फ्रँकच्या डायरी विषयी.... शाळेत- कॉलेज मध्ये असताना उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तशा सध्या कोरोनाच्या सुट्ट्या आपण सगळेच जण उपभोगत आहोत. मी जरी विनोदाने हे म्हणत असलो तरी प्रकरण काही विनोदाने घेण्या जोगे नाहीये. जागतिक माहामारी म्हणून सध्या ह्या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. तेव्हा आपणही काळजी घेऊन घरातच बसायला हवं आणि प्रशासनाला सहकार्य करायला हवं. परंतु हे घरात बसने काही सोप्प काम नाही. माणसाला सतत काही ना काही करमणूक हवीच असते. तसा माणूसही थोडा विचित्रच प्राणी आहे. अर्थातच त्याला मीही काही अपवाद नाहीये बर.... जेव्हा खूप काम असत तेव्हा तो म्हणतो वेळ मिळत नाही आणि आता वेळच वेळ आहे तर म्हणतो वेळ जात नाही. घरात इनमीन पाच माणसं आहेत आमच्या. आता प्रत्येक जण करून करून किती करमणूक करणार. बर सासू सुनांची भांडण ठरलेलीच आहे. ती कुठल्याही युगात आणि कुठल्याही परिस्थितीत होऊ शकतात. त्याने माझी करमणूक होते पण त्यालाही काही सीमा आहेच ना.. आता वडिलांकडून करमणुकीची अपेक्षा करणे म्हणजे महाकठीण काम. टीव्ही पाहता पाहता ते विचारतात, 'हे कोरोनाचं प्रकरण वाढत चाललंय.....