पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा

इमेज
"थिजलेल्या काळाचे अवशेष" नीरजा यांची ही पहिली कादंबरी.  भारत आणि त्याची ओळख विविधतेत एकता अशी आहे. किती भारी ओळख आहे ही... शाळेत असताना आपल्या सगळ्यांना ही ओळख पहिल्यांदा झाली ती प्रतिज्ञेमधून ..  भारत माझा देश आहे... आमकं, तमकं, फलानं, बिस्तानं  अशी एक प्रतिज्ञा होती आपल्याला, तुम्हाला नीट लक्षात असेल तर आठवेल..  त्याच प्रतिज्ञेत एक वाक्य आहे.. "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विवीधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे..."  किती मस्त वाक्य आहे हे.. पण या वाक्याला आता काहीही अर्थ उरलेला नाहीये. किती लोकांना या देशाची विविधता मान्य आहे..? हा मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. "एकता" तर कुठच्या कुठं तोंड काळं करून लपून बसलीये तीच तिला माहीत. प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म पाहून मी नक्की कोणत्या बाजूला असावं हे आपण आता ठरवायला लागलोय. या अशा मत निर्मितीत कसलाही विचार उरला नाही, कसलाही आचार उरला नाही. कुणीतरी येतो आणि काहीतरी सांगतो आणि आपण ते खर मानतो येवढी बौद्धिक क्षमता आपली खालावली आहे.  वर्षानवर्षं ज्या वर्ण व्यवस्थेने आपल्यातल्याच एका वर्गाला प्रचं...

समान नागरी कायदा म्हणजे काय..?

समान नागरी कायदा   दि. ०५/०८/२०२० भारताच्या इतिहासातील हा ऐतिहासिक दिवस मानावा लागेल. याच दिवशी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झालं. कोरोना काळात अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊ नये असा विरोध होत असतानाही रामजन्म भूमी न्यासाने हा कार्यक्रम घडवून आणला. २०१४ पूर्वी निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने अच्छे दिन म्हणजेच चांगले दिवस येणार असं म्हणतानाच आम्ही काश्मीरचे ३७० हे कलम हटवू, राम मंदिराची उभारणी करू अशी आश्वासने दिली होती. त्यातील अच्छे दिन आले का...?  हा संशोधनाचा विषय असू शकतो परंतु काश्मीरला विशेष दर्जा देणार ३७० कलम भाजपा सरकारने हटवलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने का होईना परंतु भाजपच्याच राजवटीत राम मंदीराची उभारणी होत आहे. तिकडे राममंदिराची पायाभरणी झाली आणि इकडे समान नागरी कायद्याची मागणी जोर धरू लागली. अनेकांनी तर पुढील दोन वर्षात भारतात समान नगरी कायदा लागू झालेला असेल असं सांगूनच टाकलेलं आहे. आता अस होईल कि नाही हे आम्हाला माहित नाही परंतु समान नागरी कायदा म्हणजे काय...? हे आम्हाला माहित आहे... त्याचाच उहापोह आपण इथे करूयात....   समान नागरी कायदा म्हण...