शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बघिणींनो आणि मातांनो ..., मी माझ्या भाषणाची सुरुवात मुद्दामच अशी केली. कारण आज मी बोलणार आहे अखंड हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल. बाळासाहेब म्हणजे आग, बाळासाहेब म्हणजे तेज, बाळासाहेब म्हणजे ताठ कणा , बाळासाहेब म्हणजे ठाकरी बाणा, बाळासाहेब म्हणजे हिंदूंची आन, बान , शान.. अन बाळासाहेब म्हणजे आम्हा शिवसैनिकांचे प्राण.... अशा ह्या भरतभूमिच्या वाघा बद्दल दोन शब्द बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. मित्रहो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपणाला ठाऊकच आहे. १०६ मर्द मराठ्यांच्या बलिदाने आपल्याला मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळाला. केवढे हे शौर्य आणि केवढा हा त्याग... मी त्या सर्व शहिदांसमोर नतमस्तक होतो. माझा तुम्हाला सवाल आहे.. काय संयुक्त महाराष्ट्र झाल्याने मराठी जनांचे प्रश्न सुटले होते..? काय मराठी जनांना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या होत्या...? दुर्दैवाने याची उत्तरं नाही अशीच द्यावी लागतात. आपल्या दुबळेपणाचा फायदा कायमच परके घेत आले आहे. इथे हि तसेच झाले. मुंबई तर मिळ...