थिजलेल्या काळाचे अवशेष : नीरजा
"थिजलेल्या काळाचे अवशेष" नीरजा यांची ही पहिली कादंबरी. भारत आणि त्याची ओळख विविधतेत एकता अशी आहे. किती भारी ओळख आहे ही... शाळेत असताना आपल्या सगळ्यांना ही ओळख पहिल्यांदा झाली ती प्रतिज्ञेमधून .. भारत माझा देश आहे... आमकं, तमकं, फलानं, बिस्तानं अशी एक प्रतिज्ञा होती आपल्याला, तुम्हाला नीट लक्षात असेल तर आठवेल.. त्याच प्रतिज्ञेत एक वाक्य आहे.. "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विवीधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे..." किती मस्त वाक्य आहे हे.. पण या वाक्याला आता काहीही अर्थ उरलेला नाहीये. किती लोकांना या देशाची विविधता मान्य आहे..? हा मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. "एकता" तर कुठच्या कुठं तोंड काळं करून लपून बसलीये तीच तिला माहीत. प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्म पाहून मी नक्की कोणत्या बाजूला असावं हे आपण आता ठरवायला लागलोय. या अशा मत निर्मितीत कसलाही विचार उरला नाही, कसलाही आचार उरला नाही. कुणीतरी येतो आणि काहीतरी सांगतो आणि आपण ते खर मानतो येवढी बौद्धिक क्षमता आपली खालावली आहे. वर्षानवर्षं ज्या वर्ण व्यवस्थेने आपल्यातल्याच एका वर्गाला प्रचं...